सावंतवाडी : नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे.
सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रयत पिलगिचा रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थांच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतगायत या देवस्थानची ओळख नवसाला पावणारा व हाकेला धावणारा भक्तांचा रक्षणकर्ता देव अशीच आहे. या देवाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.