मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात “हा” ड्रेस कोड लागू होणार

भाविकांना दर्शन घेण्यासाठी घालावा लागणार ड्रेस कोड

मुंबई: आजकाल सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य केला आहे.आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.ड्रेस कोडच्या नियमांचा पालन न केल्यास बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना तुम्हाला आता ड्रेस कोडच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

कसा असावा ड्रेस कोड?

भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती देताना सिद्धिविनायक मंदिर सदस्य राहुल लोंढे म्हणाले, पुढच्या आठवड्यापासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. काही भक्तांच्या तक्रारी , सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तर सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. त्यामुळे यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे

error: Content is protected !!