कुडाळ : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महाकुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहून पवित्र स्नानाचा लाभ घेतला.
हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असलेल्या आणि तब्बल १४४ वर्षांनी उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराजमध्ये आयोजित केला जाणाऱ्या महाकुंभमेळ्याला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाचा लाभ घेतला.