कुडाळ : कोकणचे सुपुत्र आणि समाजवादाचे अग्रदूत बॅ. नाथ पै यांच्या 54 व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात शालेय व खुला गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये शालेय गटामध्ये कु. प्रतीक्षा संजय पाटील कणकवली कॉलेज, कणकवली (रु.४५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) कु. श्रावणी राजन आरावंदेकर कुडाळ हायस्कूल, कुडाळ द्वितीय क्रमांक (रु.३५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) कु. कशीश दत्तप्रसाद खडपकर कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ, तृतीय क्रमांक( रु.२५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) तर कु.समीक्षा सुभाष मर्गज दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय , पणदूर उत्तेजनार्थ ( रु.१०००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह ) या स्पर्धकांनी यश संपादन केले.
तसेच खुला गटात श्री.संग्राम सतीश कासले प्रथम क्रमांक (रु.५५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) श्रीम. प्रणिता भक्तराज राऊळ- द्वितीय क्रमांक( रु.३५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) श्रीम. शेफाली कशाळीकर व श्रीम. अंकिता संतोष पाटील तृतीय क्रमांक (रु.२५००, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) यांच्यात विभागून तर श्रीम. पार्वती धोंडी कोदे उत्तेजनार्थ ( रु.१५००,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह) या स्पर्धकांनी यश संपादन केले. या स्पर्धेत शालेय गट इयत्ता आठवी ते बारावी साठी (1)बॅ.नाथ पै आणि कोकणचा विकास. (2)सामान्य जनतेचे कैवारी बॅ. नाथ पै (3)राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका, आणि (4) वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज
तर खुला गटासाठी (1) वसुधैव कुटुंबकम आजच्या जगाची गरज (2)लोकनेते बॅ.नाथ पै (3) विद्यार्थ्यांमध्ये नीती मूल्ये रुजविणे काळाची गरज आणि (4) महिला सुरक्षा चिंता व चिंतन असे विषय देण्यात आले.. या स्पर्धेसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रमोद जमदाडे, बॅ नाथ पै बी. एड कॉलेज, कुडाळचे प्रा.नितीन बांबर्डेकर आणि सुनिता देवी अध्यापक विद्यालय, मालवणचे प्रा. नागेश कदम हे परीक्षक म्हणून लाभले.
या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना रविवार,दिनांक 19 जानेवारी रोजी झालेल्या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के. एल्. ई.चे डॉ. माधव प्रभू संस्था चेअरमन उमेश गाळवणकर ,सीईओ अमृता गाळवणकर यांच्या हस्ते व इतर विविध शिक्षणक्रमाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले.













