कुडाळ : “प्रा .मधु दंडवते यांचे व्यक्तिमत्व आजच्या काळातील विद्यार्थ्यांसहीत सर्वांना प्रेरणा देणारे आहे. ज्ञानी माणूस किती शांत व संयमी असतो. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.मधू दंडवते होत .”असे उद्गार प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले.कोकण रेल्वेचे शिल्पकार जेष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक मधु दंडवते यांची 101 वी जयंती ना बॅ . नाथ पै शिक्षण संस्थेतील सर्व अभ्यासक्रमाच्या वतीने कुडाळ व सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर मधु दंडवते याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.पुढील मनोगतमध्ये बोलताना प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी प्रा.मधु दंडवते हे एक आदर्श राजकारणी व उत्कृष्ट साहित्यिक तसेच उत्तम खेळाडू होते. प्राध्यापक पदाची जबाबदारी पार पाडत असताना ते आपसूक राजकारणाकडे वळले ;परंतु कुठलेही क्षेत्र समाजातील तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे अर्थमंत्री व रेल्वेमंत्री असताना भारताच्या आर्थिक नियोजनात व रेल्वेच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
मधु दंडवते यांचा कोकणचा विकास हा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी कोकण रेल्वे ही अशक्यप्राय गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले व आज कोकण रेल्वेमुळे तो कोकणचा विकास झालेला आहे. त्याच्या पाठीमागे प्राध्यापक मधू दंडवते यांची असलेली दूरदृष्टी दिसून येते
त्यामुळे भारतीय राजकारणामध्ये मधू दंडवते यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. प्रा मधु दंडवते यांचे निर्णय हे लोकाभिमुख होते .कारण ते स्वतः प्राध्यापक असल्यामुळे प्रत्येक निर्णया मागे त्यांची चिंतनशील वृत्ती दिसून येते. प्रत्येक निर्णय विचार ते करून घेत. सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांची नेहमी आग्रही भूमिका होती.
आज विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रा. मधु दंडवते यांच्यामध्ये असलेला साधेपणा अभ्यासुपणा ,चिंतनशील वृत्ती व ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे व आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांसाठी करणे हे गुण अंगीकारून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला पाहिजे.
याप्रसंगी बी.एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग विभागाचे प्रा. शंकर माधव, प्रसाद कानडे ,ज्ञानेश्वर तेली , ओमकार कदम, नर्सिंग अभ्यासक्रमाचे विद्यार्थी. कुडाळ रेल्वे स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेचसावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील ऑन ड्युटी स्टेशन मास्तर संदेश केरकर .श्री शिवप्रसाद पेडणेकर ,रामचंद्र धनकुटे, प्रियांका कुडव तसेच सावंतवाडी रेल्वे रिक्षा युनियनचे पदाधिकारी आणि बहुसंख्या प्रवासी याप्रसंगी उपस्थित होते.

मधु दंडवते यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे: प्रा.नितीन बांबर्डेकर
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










