चर्मकार समाजाने पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन
कुडाळ : तालुक्यातील पावशी येथील समाजबांधव दिगंबर पावसकर यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी भारतीय चर्मकार समाज मुंबई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन देऊन केली.
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष पंढरी चव्हाण, काप जिल्हाध्यक्ष सी. आर. चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी पोलिस अधीक्षक अग्रवाल यांची ओरोस येथे भेट घेऊन निवेदन दिले. अरुण होडावडेकर, कोकण उपाध्यक्ष दिगंबर पावसकर, भारत पेंडूरकर, मंगेश चव्हाण, सारिका चौगुले, अंकुश चव्हाण उपस्थित होते.
मारहाण केल्याचा आरोप
चर्मकार समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. पावसकर यांना १८ जानेवारीला काही व्यावहारिक कारणास्तव पोलिस अधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केली. पावसकर यांच्याकडून कोणतेही बेकायदेशीर वर्तन घडले असेल तर त्यांना लेखी समज बजावून त्यांच्यावर घटनात्मक कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी आमची कोणतीही हरकत नव्हती; मात्र असा प्रकार करणे चुकीचे आहे.













