रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांचे आयोजन
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी दिनांक 24 25 जानेवारी रोजी लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत शिबिराचे आयोजन माता बाल रुग्णालय कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे जिल्ह्यामध्ये जन्मजात व्यंग असलेली बालके यांच्या आजारावरती उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये मोफत स्वरूपात करण्यात येणार असून या शिबिरासाठी अति तज्ञ डॉक्टर्स भूलतद्न्य यांची टीम मुंबईहून येत आहेत या कामी उमेश गाळवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तसेच या शिबिरासाठी डॉक्टरअमेय देसाई यांचे विशेष सहकार्य व कोऑर्डिनेशन लाभले आहे डॉक्टर संजय ओक लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचे विशेष तज्ञ तसेच के एम हॉस्पिटलचे डिन आणि कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र स्टेट चे सदस्य डॉक्टर संजय ओक या शिबिरासाठी सेवा देण्यासाठी कुडाळ येथे येत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या टीम मधील इतर स्पेशालिस्ट सर्जन स्पेशलिस्ट anaesthetist तसेच असिस्टंट कुडाळ येथे येऊन माता बाल आरोग्य केंद्र या ठिकाणी दिनांक 24 व 25 या दिवशी सुमारे 40 ते 50 बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करून देणार आहेत या कामी रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच डॉक्टर संजय निगुडकर यांची सुशीला निगुडकर ट्रस्ट व बॅरिस्टर नाथ पे शिक्षण संस्था कुडाळ आणि सिविल सर्जन सिंधुदुर्ग डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सर्व प्रकारची मदत या शिबिरासाठी उपलब्ध केलेली आहे या शिबिरामध्ये शस्त्रक्रियेसाठी सुमारे 40 ते 50 बालके उद्या ऍडमिट होत असून त्यांचे जेवण खाणे व नातेवाईकांचे जेवण खाणे याची संपूर्ण जबाबदारी श्री उमेश गाळ वण कर यांनी उचललेली आहे तसेच सर्जरीसाठी लागणारी सर्व मदत सुशीला निगुडकर ट्रस्ट व सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांचे मार्फत करण्यात आलेले आहे या शिबिरासाठी येणारे स्पेशालिस्ट टीम यांची जबाबदारी रोटरी क्लब कुडाळ यांनी घेतलेली आहे गेले पाच वर्षे हे शिबिर कुडाळ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याचा फार मोठा उपयोग आजारी बालकांना झाला आहे अशी माहिती डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष रोटरी क्लब कुडाळ यांनी दिली