जिल्हयातील 90 स्पर्धकांचा 6 वयोगटात होणार सहभाग; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थिती
कुडाळ : निरोगी शरीर आणि आनंददायी जीवन जगणे याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ व एम फीट जीम कुडाळ यांचे संयुक्त आयोजित जिल्हा बाॅडीबिल्डिंग आणि महाराष्ट्र बाॅडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा “एम फीट क्लासिक “2025 चे आयोजन दि.26 जानेवारी रोजी कुडाळ नगरपंचायत पार्कींग मैदान भैरववाडी येथे सायं 6 वा आयोजन करण्यात आले असून अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थिती असणार असून जिल्ह्यातील 90 स्पर्धकांनी 6 वजनीगटात सहभाग नोंदवला असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे व एम फीट जीमचे मनिष भोगटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी इव्हेंट चेअरमन सचिन मदने ,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राजीव पवार,खजिनदार मकरंद नाईक ,राजन बोभाटे ,शशिकांत चव्हाण ,प्रमोद भोगटे ,राकेश म्हाडदळकर ,प्रथमेश पडते आदी उपस्थित होते.
स्पर्धेला लाभणार विशेष मान्यवरांची उपस्थिती—
या स्पर्धेला कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेशजी राणे ,निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे ,अप्पर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले , कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे ,कुडाळ पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम ,माजी जि.प.सदस्य संजय भोगटे ,रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली व राजेश घाटवळ ,असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर,कुडाळ नगराध्यक्षा ,आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
अमेरिकेहून आंतरराष्ट्रीय बाॅडिबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थिती – मनिष भोगटे
या स्पर्धेला एम फीट जीमचे संचालक मनिष भोगटे यांचे आंतरराष्ट्रीय जीम ट्रेनर तथा आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा हे खास अमेरिकेहून उपस्थित राहणार असल्याचे एम फीट जीमचे संचालक मनिष भोगटे यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे– इव्हेंट चेअरमन सचिन मदने
हि स्पर्धा 50ते 55,55ते 60,60ते 65,65ते 70,70ते 75 व खुलागट अशा 6 वजनीगटात होणार असून सर्व वजनीगटातील मुख्य विजेत्याला रोख रू.25हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर उत्कृष्ट इंप्रूव्ह विजेत्या स्पर्धकाला रोख रू 6000 व चषक ,उत्कृष्ट पोझर ला रोख रू 6000 व चषक ,प्रत्येक वजनी गटातील प्रथम क्रमांक रोख रू 5000 गोल्ड मेडल ट्राॅफी प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक रोख रू 4000 सिल्व्हर मेडल चषक प्रमाणपत्र ,तृतीय क्रमांक रोख रू 3000 ब्रांझ मेडल चषक प्रमाणपत्र ,चौथा क्रमांक राख रू 2000 चषक प्रमाणपत्र ,पाचवा क्रमांक रोख रू 1000 चषक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे इव्हेंट चेअरमन सचिन मदने यांनी सांगितले.
यास्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हयातील नामवंत शरिरसौष्ठव स्पर्धकांचा सहभाग असणार आहे.या भव्य स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातील शरिरसौष्ठव स्पर्धकांना सहभागी व्हायचे असल्यास 9011379090 व 9325283384 यावर संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी केले.