ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल
जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक
करूळ : गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शनिवारी घाटरस्त्यावर जोरदार आंदोलन केले होते. घाटरस्ता बंद असल्याने नागरिकांचे नुकसान होत असून घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्याची मागणी यावेळी शिवसेना नेत्यांनी केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली असता त्यांनी सोमवारी यासंदर्भात शिवसेना नेते , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. याबैठकीत शिवसेना नेत्यांच्या मागणीचा विचार करून १ फेब्रुवारी २०२५ च्या अगोदर करूळ- गगनबावडा घाट रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले आहेत. यावेळी एकेरी वाहतुकीकरिता वैभववाडी बाजारपेठ ते जामदारवाडी पर्यंतच्या रस्त्यावर डायव्हर्शन करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनीवार, ठेकेदार मिलिंद वेल्हाळ, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










