भास्कर जाधवांना मंत्री उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य !

शिवसेना (ठाकरे) पक्षाचीजवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आ दिला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या या विधानावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल की जे काही चाललंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चाललंय. शेवटी एक्स्ट्रीम टोक येतं, जेव्हा आपल्याला खात्री होते की इथं काँग्रेसचंच ऐकलं जातं किंवा काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष चालवला जातो, त्यामुळे भास्कर जाधवांचं हे मत बनलं असावं, असं उदय सामंत म्हणाले.

भास्कर जाधवांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, “ते येण्याचं किंवा न येण्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. पण। भास्कर जाधव यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली मिळणार असेल तर आम्हाला आनंद आहे.”

error: Content is protected !!