अनैतिक संबंधातून पतीचा खून

कुडाळ : आपल्या अनैतिक संबंधांमध्ये बाधा ठरणाऱ्या पतीचा काटा काढल्याची कबुली सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्यामुळे कुडाळ शहरातील भाजीविक्रेता शिवा नायक याचा खून झाल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणातील सुनंदा नायक हिचा प्रियकर सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण हे फरारी आहेत याप्रकरणी सुनंदा नायक हिला १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुडाळ येथे भाजी विक्री करणारा शिवा नायक यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या हाती मिळालेल्या माहितीनुसार आणि भ्रमणध्वनीवर शिवा नायक याच्या पत्नीने केलेल्या संवादाच्या आधारावर हे प्रकरण उघडकीस आले २५ डिसेंबर रोजी सिताराम राठोड याने सुनंदा नायक हिला फोन करून शिवा नायक चा गेम वाजवायचा हे सांगितले होते. आणि तिने ठीक आहे. असं म्हटलं होतं. रात्रौ १२:३० वा. च्या दरम्याने ठरल्याप्रमाणे सिताराम राठोड व त्याचे दोन भाचे शिवा नायक राहत असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणी आले. शिवा नायक झोपला होता. आणि झोपलेला असतानाच हे तिघेजण आले सिताराम राठोड याने शिवा नायकचे पाय धरले तर अजित चव्हाण यांनी शिवा नायक च्या तोंडावर जाड कापड ठेवून आदीक चव्हाण यांनी दोरीने गळा आवळला आणि जेव्हा शिवा नायक याचा मृत्यू झाला. त्यावेळी तिघेही त्या ठिकाणाहून निघून गेले.

ही घटना आत्महत्या वाटावी या दृष्टीने शिवा नायक याची पत्नी सुनंदा नायक बनाव रचला. यामध्ये शिवा नायक याची बहीण हिला शिवा नायक यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सांगितली. तशीच आपल्या आईला सुद्धा सांगितले. पण जेव्हा ही घटना घडली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पथक गेले. त्यावेळी सुनंदा नायक हिने सांगितले की, साडीच्या साहाय्याने आपल्या पतीने आत्महत्या केली. त्याला मी स्वतः उतरविले असे सांगितले मात्र त्यावेळीच पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली शिवा नायक हा शरीराने धडधाकट होता. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर गळफासावरून उतरवणे एका स्त्रीला शक्य नाही. मात्र त्यावेळी त्यांनी कोणतीही चौकशी न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

या प्रकरणांमध्ये शिवा नायक याच्या पत्नी सुनंदा नायक हिचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता. या कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली आणि भाषांतर केले तर यामध्ये शिवा नायक याचा घातपात झाल्याचे उघड झाले.

चौकशीच्या तक्रारी अर्जावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सुनंदा नायक ची चौकशी केली होती. आणि चौकशी केल्यानंतर तिला सोडण्यात आले होते. ती आपल्या सासरी विजापूर येथील काळगी दांडा येथे गेली होती. या ठिकाणी कुडाळ पोलिसांनी पथक पाठवून तिला कुडाळमध्ये चौकशीसाठी पुन्हा आणले. त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांनी विरोध केला मात्र चौकशीसाठी घेऊन जाणे गरजेचे असल्यामुळे तिला पोलीस घेऊन आले.

कुडाळ पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सुरुवातीला ती वेगवेगळ्या प्रकारे संदर्भ न जुळवणारी बतावणी करू लागली अखेर पोलिसांनी आपला खाकी इंगा दाखवल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली. शिवा नायक व सुनंदा नायक यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला त्यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दहा वर्षाची मुलगी ही कणकवली येथे राहते तर दोन मुलं ही कुडाळ येथे त्यांच्यासोबत राहत होती. हे प्रकरण घडले त्यावेळी ही मुलं त्यांच्यासोबतच होती.

या चौकशीमध्ये शिवा नायक याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे याप्रकरणी त्याची पत्नी सुनंदा नायक हिने सांगितले की माझ्या व सिताराम राठोड यांच्या अनैतिक संबंधांमध्ये शिवा नायक बाधा ठरत होता. त्यामुळे त्याचा आम्ही काटा काढला. यावेळी सिताराम राठोड यांचे भाचे अजित चव्हाण व आदीक चव्हाण हे दोघेही होते. यावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सुनंदा नायक हिला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. या प्रकरणातील फरारी आरोपी तसेच अजून कोणाचा सहभाग आहे का या खुनासाठी वापरलेली साहित्य हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणातील तिघे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यापासून फरारी झाले आहेत. त्यापैकी अजित चव्हाण हा कुडाळ येथे राहत होता तर त्याचा भाऊ आदिक चव्हाण या घटनेपूर्वी दोन दिवस अगोदर कामासाठी विजापूरहुन कुडाळ येथे आला होता. अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.

या प्रकरणातील सिताराम राठोड याची पत्नी अजित चव्हाण व अधिक चव्हाण यांच्या आईची कुडाळ येथे हजेरी ठेवली आहे या प्रकरणातील प्रताप पवार हा त्याच्यासोबत मद्य पिण्यासाठी होता त्यामुळे त्याची सुद्धा हजेरी लावण्यात आली आहे.

शिवा नायक याचा घातपात करणारे सिताराम राठोड सह त्याचे भाचे या सर्वांनी शिवा नायक याच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. आपल्यावर कोणताही संशय येऊ नये याची खबरदारी घेतली होती मात्र कॉल रेकॉर्ड मुळे सगळं भांड उघड झालं.

error: Content is protected !!