स्वरांजली अभंगगाथा हा भजनी कलाकारांना प्रेरणा देणारा उपक्रम चिरकाल सुरू ठेवा- चंद्रसेन पाताडे


करंजे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ व बुवा गजानन करंजेकर यांचा सलग नऊ वर्षे उपक्रम

संतोष हिवाळेकर / पोईप

करंजे : गेली सलग नऊ वर्षे भजनी कलाकारांना अभंग सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नववर्षाच्या सुरुवातीलाच सुश्राव्य अश्या अभंगांनी वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या अश्या उपक्रमाची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून भजनी कलाकारांना प्रेरणा देणारा हा उपक्रम चिरकाल सुरू ठेवावा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.


श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ करंजे यांच्यावतीने बुवा श्री.गजानन करंजेकर यांच्या वाढदिन निमित्त करंजे रोहिदास नगर येथे स्वरांजली अभंगगाथा हा जिल्ह्यातील भजनी बुवा व मृदुंगमणी यांचेसाठी संपन्न कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रसिद्ध भजनी बुवा अनिल पांचाळ,बुवा गजानन करंजेकर,उन्नती मंडळाचे सदस्य आनंद जाधव,स्वीकृत सदस्य मंगेश आरेकर,कणकवली उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण,विजय जाधव,युवा संकल्प चे सचिव संदीप चव्हाण, सुंदर जाधव, श्री.पवार गुरुजी,नितीन पवार,सूर्यकांत नेवरेकर,चंद्रकांत करंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उपस्थित गुरुवर्य व सुप्रसिद्ध भजनी बुवा अनिल पांचाळ यांचेसहित काही बुवांनी आपले सुश्राव्य अभंग सादर केले.त्यांना प्रसिद्ध मृदुन्गमणी यांनी संगीत साथ केली.या सर्व भजनी कलाकारांना गौरविण्यात आले.बुवा गजानन करंजेकर यांचा वाढदिन त्यांना शुभेच्छा देत साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या या उपक्रमाला महानंद चव्हाण, अनिल पांचाळ,पवार गुरुजी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुवा गजानन करंजेकर यांनी मांडले.सूत्रसंचालन साक्षी नेवरेकर,आनंद जाधव व महेंद्र चव्हाण यांनी केले.शेवटी आभार साक्षी नेवरेकर यांनी मानले.

error: Content is protected !!