मुंबई: महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूप गाजली. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात ६ हफ्ते जमा झाले असून, त्यांना एकूण ६००० रुपये मिळाले आहेत. मात्र, काही महिलांनी उशिरा अर्ज केले किंवा अजून अर्जच भरलेला नाही. आता त्या महिलांसाठी दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. कधीपासून प्रक्रिया सुरू होईल, याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होईल.लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात या योजनेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. महिलांना यापुढे दर महिन्याला २१०० रुपये देण्यात येणार आहेत. ही घोषणा झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरूवात होऊ शकते. मात्र, या प्रक्रियेसाठी महिलांना काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
अद्याप अर्ज न भरलेल्या महिलांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. महिलांनी आधार लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी, अशी सूचना करण्यात आली आहे.













