मंत्री उदय सामंत यांनी गावात लुटला क्रिकेट खेळायचा आनंद

रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद मंत्री उदय सामंत यांनी लुटला आहे.

Oplus_131072

गावातील खेळाडूंसोबत मैदानावर फलंदाजी करण्याचा आनंद घेतला. यामुळे गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मुलांशी संवाद साधून खेळाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली. मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघभावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

पाहा व्हिडिओ

error: Content is protected !!