मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना आ. सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मनसे नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना चांगलेच सुनावले आहे.
“तुम्हाला तुमचे जे काही राजकारण करायचं ते करा पण यामध्ये मराठी अभिनेत्रींना ओढू नका. मराठी कलाक्षेत्रातल्या कोणत्याही कलाकाराचा अपमान मी सहन करणार नाही. या सगळ्याचा निषेध व्हायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची ताबडतोब माफी मागायला हवी”, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.
दरम्यान हे सगळं घडत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी सुट्ट्या एन्जॉय करत होती. ती देवदर्शनासाठी उज्जैनला गेली आहे. तिने उजैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहे. फुलवंती सिनेमाच्या बिझी शेड्यूलनंतर ती निवांत सुट्ट्यांचा आनंद घेत होती. पण या प्रकरणानंतर तिला खूप मोठा धक्का बसला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात जाणार असून पत्रकार परिषद देखील घेणार आहे.













