आचरा पोलिस स्टेशनच्या वतीने शिरवंडे हायस्कूल येथे सायबर क्राईम आणि नशामुक्त सिंधुदुर्ग बाबत जनजागृती उपक्रम

संतोष हिवाळेकर पोईप

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई( शिरवंडे असगणी किर्लोस संचलित )त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे आचरा पोलीस स्टेशन च्या वतीने सुरक्षित समाज व्यवस्थेसाठी जनजागृती अभियान अंतर्गत सायबर सुरक्षा आणि नशा मुक्त सिंधुदुर्ग याबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला .यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री विशाल चोरगे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा ,सायबर गुन्हे आणि त्याचे प्रकार व त्यापासून कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नशा मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावे असे आव्हान केले. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी याबाबत माहिती द्यावी आणि सायबर क्राईम आणि नशा यांचे दुष्परिणाम पालकांना समजावून सांगावेत असे पीएसआय श्री .विशाल चोरगे त्यांनी सांगितले .तसेच डायल ११२ चे महत्व समजावून सांगितले .त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोबाईल फोन वापरण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच इयत्ता दहावीचे वर्ष महत्त्वाचे असून याच काळात आपले ध्येय ठरवा आणि ते ध्येय मनाला वारंवार सांगा असे केल्याने पुढील चार-पाच वर्षात आपल्याला यश निश्चित मिळेल असे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना श्री चोरगे साहेब चोरगे यांनी सांगितले. या कार्यक्रमानिमित्त आचरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय श्री एस एस खंडागळे एएसआय श्रीमती देसाई मॅडम होमगार्ड श्रीमती बागवे मॅडम ,शिरवंडे पोलीस पाटील सौ गावकर उपस्थित होते .संस्था व शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक श्री वामन तर्फे आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा व नशा मुक्त सिंधुदुर्ग या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत एकूण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना आचरा पोलीस स्टेशनच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात गौरविण्यात आले. या स्पर्धेत कुमारी भक्ती सुनील परब हिने प्रथम क्रमांक, कुमार आर्यन उत्तम गावकर द्वितीय क्रमांक कुमारी अश्विनी जंगले हिने तृतीय क्रमांक वकुमारी स्नेहल सोनू गावकर उत्तेजनार्थ असे यश संपादित केले सहभागी सर्व मुलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले शेवटी श्री काणेकर डी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!