गुन्हा घडण्यापूर्वी तो होऊ नये याची काळजी घेणे उत्तम :प्रमोद काळसेकर

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सायबर गुन्हे जनजागृती’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ :”गुन्हा घडण्यापूर्वी तो होऊ नये याची काळजी घेणे उत्तम. समाजमान्य नसलेली गोष्ट खुणावत असताना सदसद्वीविवेक बुद्धी जागृत ठेवा. की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला योग्य आकार मिळेल .कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘सायबर गुन्हे जनजागृती’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांनी काढले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या पुढील मनोगत मध्ये अमली पदार्थ व तरुण पिढी यासंदर्भात मार्गदर्शन करताना योग्य संगत धरा .समाजमान्य नसणाऱ्या अमिषाला बळी पडू नका.विनाशाकडे नेणाऱ्या, आपल्या कुटुंबाला लाज आणणाऱ्या गोष्टी करण्याचा आग्रह धरणाऱ्या मित्रांपासून लांब राहा. त्यासाठी योग्य मित्रांची ,योग्य जोडीदारांची निवड करा . एकदा वाट चुकलां की पुढे अंधार आहे .याचे भान ठेवा .सोशल मीडियाच्या वापरा बाबत सावधानता बाळगा. असे आवाहनही केले . अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. कोणत्याही अनोळखी नंबर वरून आलेल्या लिंक ओपन करू नका . कोणालाही मोबाईल वर आलेला ओटीपी देऊ नका. पैशाच्या शॉर्टकटच्या मागे लागू नका .”असे सांगत सायबर क्राईम ऑनलाईन कर्ज, ऑनलाईन सायबर क्राईम, फ्रॉड कॉल याबाबत सावधगिरी बाळगण्याचे सोदाहरण मार्गदर्शन केले .*महिला सक्षमीकरण* याबाबत मुलींना सावध करताना खोट्या स्तुतीला बळी पडू नका. सोशल मिडियामार्फत ओळख झालेल्या व्यक्तीला एकांतात भेटणे. या चुका करू नका. वाईट गोष्टीसाठी आग्रह धरणारा मित्र हा तुमचा मित्र असूच शकत नाही .हे लक्षात ठेवा व त्यापासून दूर जा. नाहीतर आयुष्याची माती होईल.” असा सबुरीचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. व काही सावधगिरी साठीच्या जित्याची खोड, अमली पदार्थ, फ्रॉड कॉल कर्ज, सायबर ब्लॅकमेलिंग व संकटकाळांमधील हेल्पलाइन ११२,१९३० चा वापर यासंदर्भातील काही . चित्रफिती सुद्धा विद्यार्थ्यांना दाखविल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस तंत्रज्ञ विशाल पाटील, सावंतवाडी पोलीस आवारातील समुपदेशन केंद्राच्या अर्पिता वाटवे, तृप्ती धुरी, प्रा. अरुण मर्गज, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे,सेंट्रल प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण मर्गज यानी केले.

error: Content is protected !!