आरोसमध्ये बिबट्याची दहशत !

सावंतवाडी : आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिनाभरात एक दिवस आड करून तब्बल 13 बोकडे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तर ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु जबड्यात पकडलेला बोकड बिबट्याने न सोडता जंगलात धूम ठोकली. बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या बोकडांवर वारंवार बिबट्याकडून हल्ला होत असल्यामुळे पशुपालक बबन केदु शेळके यांचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आरोस भागात बिबट्याची दहशत पसरली आहे.

error: Content is protected !!