संतोष हिवाळेकर पोईप
पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रयोगशाळा इमारत उद्घाटन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,उद्घाटक उद्योजक व माजी विद्यार्थी आर डी परब, प्रमुख पाहुणे उद्योजक श्री दत्ता सामंत ,सनदी लेखापाल व माजी विद्यार्थी श्री सुहास पालव ,उद्योजक श्री सुरेश नेरुरकर ,
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 10.30 ते 11 वाजता माननीय श्री आर डी परब यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळा इमारतीचे उद्घाटन,
11 ते 1 बक्षीस वितरण व आर डी परब यांचा सत्कार सोहळा ,
1ते 2 स्नेहभोजन ,दुपारी 2 ते 5 वा विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर होणार आहेत
निमंत्रक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ केतकी सावंत, पोईप सर्कल संस्था सोसायटी अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,मुख्याध्यापक श्री विकास कुंभार, शालेय मुख्यमंत्री अथर्व माधव, सांस्कृतिक मंत्री श्रेया धुरी, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री गोपीनाथ पालव, सेक्रेटरी श्री विलास माधव, खजिनदार श्री महेंद्र पालव ,उपसेक्रेटरी श्री महेश पालव, सदस्य श्री श्रीकृष्ण माधव, श्री श्रीधर नाईक, श्री कमलेश प्रभू, श्री सत्यवान पालव, श्री नामदेव पुजारे, श्री विश्वनाथ पालव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी