कुडाळ: हल्ली प्रत्यकेच्याच मोबाईल वर कॉल केला की सावधान..अस म्हणत सायबर हॅलो ट्यून ऐकायला येते.समोरील कोणी कस्टम, सीबीआय व न्यायाधीश बोलत असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल करत असल्यास त्यासंदर्भात नागरिकांनी लगेचच जवळच्या पोलिसांकडे संपर्क साधावा,या हॅलो ट्युन मधे करण्यात येते ही हॅलो ट्यून केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. या हॅलो ट्यून च्या माध्यमातून नागरिकांना गृह मंत्रालयाने आवाहन केले आहे
या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मोबाईलवर त्यासंदर्भातील हॅलो ट्यून ऐकायला मिळत आहे.सायबर गुन्हेगार समोरील व्यक्तींना विविध आमिष देऊन किंवा गुन्हा दाखल करणे किंवा अटक करण्याची धमकी देऊन फसवितात. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील नामांकित हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तुमच्या मोबाईलवरून पॉर्न साईडला भेट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून मोठ्या रकमेला फसविले होते. अनेकदा व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग प्रसारित करण्याची धमकी देऊनही फसविल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘सीबीआय’चे अधिकारी आहोत म्हणून धाडी टाकण्याची धमकी देऊनही फसविण्याचेही प्रकार होत आहेत. तुमच्या नावे असलेल्या पार्सलमध्ये गांजा किंवा नशेचे पदार्थ सापडले आहेत, तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्याच्या धमक्याही अनेकांना येत आहेत. शेकडो लोक या धमक्यांना घाबरून कोट्यवधी रुपयांना फसले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांच्या जागृतीसाठी मोबाईलची हॅलो ट्यून त्यासंदर्भातील ठेवण्यात आली आहे.