पंचायत समिती मालवण शिक्षण विभाग यांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यावर्षी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या माध्यमिक शाळेमध्ये दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय डॉ. गणपती कमळकरसाहेब यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालवण तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी माननीय श्री. प्रफुल्ल वालावलकरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी मा. श्री. शेर्लेकरसाहेब, संस्थेचे चिटणीस माननीय श्री. जी. एस. परब, सदस्य श्री. नंदकुमार राणे, कार्यक्रमाचे तथा शालेय समितीचे अध्यक्ष श्री. किशोर नरे, सदस्य श्री. विजय कांबळी, कार्यक्रमाचे आयोजक तथा गटशिक्षणाधिकारी मालवण मा. श्री. संजय मानेसाहेब, हडी गावचे सरपंच श्री. प्रकाश तोंडवळकर, कांदळगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. मधुरा परब, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. प्रतापराव खोत, विज्ञान प्रतिकृती परीक्षक काळसे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. पेडणेकर सर, श्री लिंगेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडाळचे प्राध्यापक श्री. राठोड सर, श्री मोरेश्वर गोगटे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. कर्ले सर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बेळेकर सर, तंत्रनिकेतन मालवणचे श्री. तलवारे सर, तांत्रिक विद्यालय मालवणचे श्री. जमादार सर , कक्तृत्व व निबंध स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालय मालवणचे प्राध्यापक श्री. नागेश कदम सर, श्री. संग्राम कासले, केंद्रप्रमुख मा. श्री. श्रीकृष्ण बागवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई येथील उद्योजक तथा मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ. दीपक परब व प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती यू. डी. मुरवणे ह्या उपस्थित होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस माननीय श्री. जी. एस. परब, सदस्य श्री. नंदकुमार राणे, शाळेचे माजी विद्यार्थी जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी माननीय श्री. प्रशांत पारकर, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. किशोर नरे, सदस्य श्री. विजय कांबळी, लोकनिर्धार चॅनेलचे विशालजी राणे, ग्रामस्थ शेखर ना. राणे, केंद्रप्रमुख श्री. श्रीकृष्ण सावंत, डॉ. उज्ज्वल मुरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मालवण तालुका विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे – विद्यार्थीनिर्मित विज्ञान प्रतिकृती प्राथमिक गट- प्रथम भक्ती नागेश परब -प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय लावण्य दीपक गोसावी- जीवन शिक्षण विद्यामंदिर कोळंब नंबर १, तृतीय आदित्य देविदास प्रभूगावकर -अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण,
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-प्रथम ओम चंद्रशेखर आंबेरकर- अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण, द्वितीय ओमतेज उल्हास तारी-प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय कुणाल जाधव-डॉक्टर एस. एस. कुडाळकर हायस्कूल,मालवण.
शिक्षकनिर्मित विज्ञान प्रतिकृती प्राथमिक- प्रथम श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर -जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा, द्वितीय सौ.प्रिया सुनील मेस्त्री – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळे नंबर १, तृतीय श्री. देविदास नामदेव प्रभूगावकर-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफेखोल नंबर १.
माध्यमिक व.उच्च माध्यमिक शिक्षकनिर्मित विज्ञान प्रतिकृती – प्रथम श्री. विष्णु दत्तराम काणेकर- त्रिमूर्ती माध्यमिक विद्यामंदिर शिरवंडे, द्वितीय श्री. मिलिंद मधुसूदन गावकर- माध्यमिक विद्यालय असरोंडी, तृतीय श्री. तुषार दशरथ सकपाळ-आर. ए. यादव हायस्कूल आडवली.
प्रयोगशाळा साहाय्यक परिचर निर्मिती विज्ञान प्रतिकृती-
प्रथम श्री. प्रकाश विश्वनाथ खोडके- ओझर विद्यामंदिर कांदळगाव, द्वितीय श्री. विजय वामन लिंगायत- प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय श्री. संदीप आत्माराम धामापूरकर-श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे.
दिव्यांग विद्यार्थिनिर्मित विज्ञान प्रतिकृती प्राथमिक-
प्रथम तेजस रामचंद्र केळुसकर-डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल देवबाग, द्वितीय ओम महेश करावडे -भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके.
माध्यमिक व उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थिनिर्मित विज्ञान प्रतिकृती – प्रथम ओमकार पंकज राणे- प्रगत विद्यामंदिर रामगड.
निबंध स्पर्धा प्राथमिक- प्रथम आदित्य देविदास प्रभुगावकर-अ शि दे टोपीवाला हायस्कूल मालवण, द्वितीय यशश्री गुरुनाथ ताम्हणकर- न्यू इंग्लिश स्कूल माळगाव, तृतीय गौरी निलेश घाडीगावकर-प्रगत विद्यामंदिर रामगड.
माध्यमिक व उच्च माध्यमिक- प्रथम वैभवी विद्याधर मेस्त्री- अ. शि. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज मालवण, द्वितीय नीरजा संजय परब- प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय वेदिका मंगेश परब – सौ.ई.द.वर्दम हायस्कूल पोईप.
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक-
प्रथम मनस्वी पल्लव कदम-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडवली नंबर १, द्वितीय पार्थ प्रदीप सामंत- टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय प्रिया विलास पेंडूरकर- न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक-
प्रथम वेदांत शिवप्रसाद नाईक-अ. शि. दे टोपीवाला ज्युनिअर कॉलेज मालवण, द्वितीय सेजल सत्यवान केळुसकर- ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी, तृतीय सौरवी गंगाराम देसुरकर -भंडारी एज्युकेशन सोसा.ज्युनिअर कॉलेज मालवण.
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक-
प्रथम तृप्ती दीपक परुळेकर व प्रांजली संजय कुंभार- ओझर विद्यामंदिर कांदळगाव, द्वितीय तन्वी जगदीश घाडीगावकर व ओंकार सुनील लाड -आर. ए. यादव हायस्कूल आडवली, तृतीय अदिती गुरुप्रसाद परब व भाविक दीपक देसाई- रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल मालवण.
प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक –
प्रथम श्रेयस चंद्रशेखर बर्वे व निशांत शरद धुरी -अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण, द्वितीय धृती केशव भोगले व विराज विश्वनाथ परब- भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे, तृतीय संचिता संदेश परब व भूमिका सदानंद कोचरेकर- ओझर विद्यामंदिर कांदळगाव.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती मालवणचे गटशिक्षणाधिकारी आयोजक माननीय श्री. संजय मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे कर्मचारी वर्ग- डी. डी. जाधव, ए. ए. शेर्लेकर, एन. एस. परुळेकर, पी. के. राणे, एस. जे. सावंत, पी. आर. पारकर, सुनयना पवार, आर. जे.जाधव, पी. व्ही. खोडके, एम. डी. परुळेकर, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, नरेश करलकर, भाऊ वझे रेवंडी, माता पालक संघ, , शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, रामगड हायस्कूलचे शिक्षक श्री. पवार सर,कर्मचारी श्री. विजय लिंगायत, भंडारी हायस्कूलचे शिक्षक श्री. अवसरे सर, चौके हायस्कूलचे शिक्षक श्री. परुळेकर सर, आडवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सकपाळ सर, त्र्यंबक हायस्कूलचे श्री. धुरी सर, वांगणी हायस्कूलचे संजय जाधव सर, विस्तार अधिकारी श्री. दीक्षितसाहेब यांनी विशेष मेहनत घेतली. भोजनासाठी लागणारे साहित्य व व्यवस्था शालेय समितीचे सदस्य श्री. विजय कांबळी व भद्रकाली देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत करण्यात आली होती. तर अल्पोपाहाराचे साहित्य व व्यवस्था कांदळगाव येथील माता पालक यांनी केली. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. संजय मानेसाहेब यांचे सर्वांनी कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनाला मालवण तालुक्यातील अनेक विज्ञानप्रेमींनी भेट देऊन बालवैज्ञानिकांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक प्रवीण पारकर तर आभार पी. के. राणे यांनी मानले.