कुडाळ: ऐतिहासिक वारसा लाभलेला,परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा आणि स्वतःची एक आख्यायिका घेऊन रुजिव पाषानाणे पावन असे श्री स्वयंभू महादेव मंदिरचा काल दिनांक २० डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव होता.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जत्रोत्सव भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.श्री स्वयंभू महादेवाच्या पालखीच्या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन गेला.श्री स्वयंभू महादेवाचे सगुण साकार रूप अतिशय विलोभनीय होते. ओटी भरण्यासाठी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांगच रांग दिसत होती.आज जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून देव गावच सीमा फिरणार असुन हा सोहळा डोळ्यांची पारणे फिटनारा असतो.