दारूच्या अति आहारी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाने गुरांचा गोठ्यामध्ये लाकडीवाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाकेड शेट्येवाडी येथे दिनांक १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकेड खालची शेट्येवाडी येथील केदार प्रदीप शेट्ये (वय ३७) याला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या अतिव्यसनापायी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.१५ या कालावधीत घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये जाऊन लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची खबर भाऊ सागर प्रदीप शेट्ये याने लांजा पोलिसांना दिली होती. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.