कुडाळ प्रतिनिधी: सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निरुखे गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरुखे नं .१ या प्रशालेत शिकणारे विद्यार्थी हे कलागुणांनी समृध्द असतातच .त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत यश संपादन करतात.कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४-२५ मध्ये केंद्र स्तरासोबतच शाळेने प्रभागस्तरावर देखील आपल्या यशाची छाप उमटवलेली आहे. खो खो – मोठा गट मुलगे – विजेतारिले – मोठा गट मुलगे – विजेताधावणे १०० व २०० मी . – मोठा गट मुली – दिशा अशोक सावंत – प्रथमलांब उडी – मोठा गट मुलगे – यश सचिन नाईक – द्वितीयउंच उडी – मोठा गट मुली – यशश्री रमेश चव्हाण – द्वितीयउंच उडी – लहान गट मुली – श्रेया अजय चव्हाण – द्वितीय असे भरघोस यश संपादन करून आता ही शाळा तालुका स्तरावर कडावल प्रभागाचे नेतृत्व करणार आहे.शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून तसेच समस्त निरुखे ग्रामस्थांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन .