डंपरखाली येऊन मोटरसायकलस्वर ठार
रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील उद्यान नगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला.
येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे. या रोडवर आज भीषण अपघात झाला असून मोटर सायकल स्वार डंपर खाली आल्याने डंपरच्या चाकावर आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा पंचनामा सुरू असून अपघातात मृत्यू पावलेल्या चे नाव अद्याप समजलेले नाही.