पूर्णगड येथील महिलेची सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनी प्रमुखाकडून फसवणूक

लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत 2 लाख 30 हजार 499 रुपयांन लुबाडले

रत्नागिरी । प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप, कातळवाडी येथे लोन कंपनीकडून लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची 2 लाख 30 हजार 499 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली आहे.

ओमकार पालव (रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादीने महिलेने पूर्णगड पोलिस ठाण्यात सोमवार 16 डिसेंबर रोजी तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादी महिला आणि व साक्षिदार हे दोघे गोळप कातळवाडी येथे राहतात. त्यांनी 24 ऑक्टोबर 2024 रोजी एका वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीवरुन स्मॉल फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीचे लोन विभागाचे प्रमुख ओमकार पालवशी संपर्क करुन कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

त्यावर संशयित ओमकारने फिर्यादी महिलेला 10 ते 12 महिलांचा गट तयार करा, तुम्हाला कर्ज पुरवण्याची व्यवस्था करतो असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्जाच्या प्रक्रियेसाठी सभासद नोंदणी, भाग-भांडवल फी, नोटरी स्टँप व वकिल कोर्ट फी स्टँप यासाठी संशयित ओमकाल पालवने फिर्यादी महिलेकडून रोख व गुगल पे व्दारे एकूण 2 लाख 30 हजार 499 रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून कर्ज न देता फसवणूक केली. या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),316(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!