ब्युरो न्यूज: NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पाठयक्रम ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या पाठयक्रमाचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी NMC च्या nmc.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
खाली दिलेल्या सूचना पाळून सिलेबस डाउनलोड करा:
या संदर्भात NMC ने एक नोटीस जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये एक महत्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये सांगितले गेले आहे कि “सर्व हितधारक, विशेषत: इच्छुक उमेदवारांना कळवण्यात येते की नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने NEET (UG)-2025 साठीचा अभ्यासक्रम अंतिम केला आहे.
“भौतिकशास्त्र (Physics): महत्त्वाचे घटक: मापन आणि गणना, गतीशास्त्र, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, गुरुत्वाकर्षण, स्थायुरचना व द्रवरूप गुणधर्म, थर्मोडायनॅमिक्स, दोलन आणि तरंग, विद्युतधारा आणि चुंबकीय प्रभाव, आदी.
रसायनशास्त्र (Chemistry): विभाग: सेंद्रिय (Organic), असेंद्रिय (Inorganic) आणि भौतिक (Physical) रसायनशास्त्र.भर: रासायनिक अभिक्रिया आणि संयुगे.
जीवशास्त्र (Biology): घटक: जनुकशास्त्र (Genetics), पर्यावरणशास्त्र, पेशींची रचना, वनस्पती व प्राणी शारीरशास्त्र, जैवतंत्रज्ञान, इत्यादी.
परीक्षेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अभ्यास करताना NEET 2025 च्या नवीन अभ्यासक्रमाचा आधार घ्या.


Subscribe





