कुडाळ : 15 डिसेंबर 2024 रोजी नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने रांगणागड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.. या मोहिमेत नारुर ग्रामस्थ, अंगणवाडीचे अधिकारी तसेच सिंधुदुर्गातील शिवप्रेमी उपस्थित होते..
संपूर्ण गडाची स्वच्छता करत असताना कोल्हापूर तसेच कोकणातील मद्यपान करणाऱ्या पर्यटकांना रंगेहात पकडले.. मध्य धुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांनी आम्ही अमुक नेत्याची माणसं आहोत तमुक पक्षाचे कार्यकर्ते आहोत असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला..परंतु शिवप्रेमींनी त्यांना न जुमानता ” राजकारणाशी आम्हाला काही देणे घेणे नाही..तुम्ही कुठच्याही पक्षाचे कोणत्याही नेत्याचे कार्यकर्ते असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही.. गडावर मद्यपान करणं हा कायद्याने गुन्हा आहे.सर्वांना नियम सारखेच..गडावर मद्यपान करताना सापडला तर कडक कारवाई केली जाईल.. मग कोणताही नेता कोणताही अधिकारी असेल तरी त्याची गय केली जाणार नाही, असे खडे बोल सुनावले .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी मंदिरासमान आहेत.. आणि जर कोणी आमच्या मंदिरात मद्यपान करून कचरा फेकत असेल तर त्यांना महाप्रसाद दिला जाईलच त्याचबरोबर संपूर्ण गडाची साफसफाई करून घेतली जाईल आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून अशा लोकांना प्रसिद्धी दिली जाईल.. गडावर येणाऱ्या पर्यटकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी येत असाल, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी येत असाल, इथला निसर्ग इथली संस्कृती अनुभवण्यासाठी येत असाल तर अतिथी देवो भव म्हणून आम्ही आपले सहर्ष स्वागत करू मात्र इथला परिसर अस्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
*ज्याप्रमाणे नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानने गावातील सर्व भ्रष्टाचार उघडीस आणल्यामुळे आता कुणाचीही हिम्मत होत नाही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करण्याची. त्याचप्रमाणे यापुढे रांगणागडावर सुद्धा मद्यपान करून अस्वच्छता पसरवण्याची कुणाची हिम्मत होऊ नये एवढी वचक आपल्याला ठेवावी लागेल तरच आपले गड किल्ले सुरक्षित राहतील
या मोहिमेसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था एकनाथ सरनोबत आणि संदीप नाईक (रांगणाई हॉटेल) यांनी केली .. जेवणाची व्यवस्था अरविंद सावंत आणि संजय सावंत यांनी केली त्यांचे विशेष आभार स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित नारुर गावचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, ग्रामपंचायत सदस्या सानिका सरनोबत, एकनाथ सरनोबत, बापू भोगटे, रोहन सावंत, दुर्वा सरनोबत, आरोही सरनोबत, उत्तम सरनोबत, यश सरनोबत, सौम्या सरनोबत, सुधीर देवळी,संतोषी देवळी, प्रसाद सरनोबत, पूर्वा लुडबे, पूजा लुडबे, प्रशांत तळेकर, दिनेश गिरगांवकर, योगेश सकपाळ, श्वेता घाडीगावकर, रिया सरनोबत, सोनू गावडे, आप्पा वेंगुर्लेकर, संचिता कुडाळकर ( CDPO ), ललिता कासले, शैलजा मातोंडकर, मंगल सुतार, अक्षय कारविंदे, सौरभ कुडाळकर, गौरी पावसकर, सुमित्रा पेडणेकर, प्रतीक कानडे, लक्ष्मण मेस्त्री, कुमार माहुरे, सुमित बोडेकर, चंद्रशेखर सावंत, चंद्रकला ढवळ,भाग्यश्री परब, सुदेशना सारंग, अमृता सावंत, अनंत कदम, राहुल देसाई, समीर देसाई, ऋषिकेश आचरेकर, सुनील राऊळ, दीपक यांचे मनःपूर्वक आभार
येत्या 31 डिसेंबर रोजी रांगणागडावर खडा पहारा मोहीम आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील मोहिमेत कोकण दरवाजातून नारुर गावात जाणारी घोडेचीनची वाट स्वच्छ करून सुरळीतपणे चालू करण्यात येईल.. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की ” एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित ” त्याचप्रमाणे प्रत्येक गडावर एक मावळा खबरदार असेल सर्व गडकोट सुरक्षित राहतील. सुसंस्कृत भावी पिढी घडवण्यासाठी इतिहासाच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या या गडकोटांचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत..