आ.निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले

ब्युरो न्युज : आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की,

श्री. उद्धव ठाकरे,

तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आज तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…

आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.

जय महाराष्ट्र !

अशी प्रतिक्रिया आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

error: Content is protected !!