हेदुळ गावात भरवस्तीत गवा रेड्याचा वावर !

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील हेदुळ या ठिकाणी लोहारवाडी मध्ये भर वस्तीमध्ये भर दिवसा गवारेड्याचा वावर असून हा गवा ग्रामस्थांच्या अंगावर जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गवा रेड्याकडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन वावरणाऱ्या गवा रेड्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!