आंबोली चेकपोस्टवर २ लाखांच्या दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली पोलिसांची कारवाई वाहन चालक ताब्यात

सावंतवाडी बेळगाव मार्गावरील आंबोली चेक पोस्ट येथे शुक्रवारी रात्री वाहनाच्या केलेल्या तपासणीत २ लाख १६ हजार किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. या दारूसह सुमारे ८ लाख किमतीची स्विप्ट कार मिळून एकूण १० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तर या प्रकरणी वाहनचालक व्यकंटेश श्रीनिवासूलू वद्दी (वय २८ वर्षे, रा. नागामल्ला संदू (गल्ली), जी. के. स्ट्रीट, ता. प्रोद्दटूर (मंडळ), जि. कड्डापा, राज्य-आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबोली पोलीस चेकपोस्ट शुक्रवारी मध्ये रात्री संशयित हा आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार (AP-40-DZ-9261) या वाहनामध्ये गैरकायदा बिगरपरवाना 2,16,000/- रु. किमंतीची MANSION HOUSE FRENCH BRANDY गोवा बनावटीची दारुचे 15 बॉक्स बाळगून गोवा ते आंध्रप्रदेश असे आंबोली मार्गे वाहतूक करीत असताना संशयावरून त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत त्या प्रमाणात अवैध दारू असल्याचे आढळून आली.

यात सुमारे 2,16,000/- MANSION HOUSE FRENCH BRANDY असे इंग्रजी लेबल असलेल्या गोवा बनावटी दारुच्या काचेच्या 750 मि.ली मापाच्या प्रत्येकी 12 बॉटल प्रमाणे एकूण 15 बॉक्स असून त्यामध्ये एकूण 180 काचेच्या बाटल्या असून प्रत्येक काचेच्या बाटलीची किमंत 1200/- प्रमाणे मुद्देमाल आढळून आला. तर स्विफ्ट कार मिळून एकूण 10,16,000/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

सदरची कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दिपक शिंदे, मनिष शिंदे, राजेश नाईक यांनी केली.

error: Content is protected !!