कुडाळ प्रतिनिधी: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अजून दोन भत्त्यात वाढ केली आहे.नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 50% झाल्यावर ,7 व्या वेतन आयोगने इतर भत्त्यात वाढ सुचवली होती.नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्तासप्टेंबर महिन्यात नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता दोन्हींसाठी पात्रता निकषात सुधारणा करण्यात आली. 4 जुलै 2024 रोजी EPFO ने याविषयीचे एक परिपत्रक काढले. त्यानुसार, महागाई भत्ता 50% झाल्यानंतर इतर ज्या भत्त्यांवर परिणाम होईल, त्यात 25% वाढ करण्यात येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2024 रोजी याविषयीची वाढ केली.
नर्सिंग भत्ता हा सर्व नर्सेसला देण्यात येतो. आता यामध्ये 25% वाढ करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2024 रोजी याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार, नर्सिंग भत्ता त्यावेळी वाढले, ज्यावेळी महागाई भत्ता 50% अधिक होईल. केंद्रीय वेतन आयोग प्रत्येक 10 वर्षानंतर तयार होतो. हे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि लाभ यांचे मुल्यांकन करते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आल्या होत्या. 17 सप्टेंबर 2024 नुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% वाढतो, त्यावेळी 25% वाढवण्यात येतो.