कणकवली प्रतिनिधी : जानवली-गावठणवाडीतील संदिप शांताराम राणे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. यापूर्वी तीनवेळा घरफोडीचा प्रकार याच घरात घडला होता.संदिप राणे हे मुंबईला राहत असतात त्याच्या शेजारी राहणारे वसंत महादेव परूळेकर घराची साफसफाई करतात. काल सायंकाळी त्यांनी अशीच घराची साफसफाई करून घर सायंकाळी ७ वाजता कुलूपबंद केले होते. सकाळी त्यांना घराच्या पुढील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला निदर्शनास आला. त्यांनी संदिप राणे यांना कॉल करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले घरात चोरीला जाण्यासारखी कोणतीही चिजवस्तू नव्हती. तेव्हा घरात जाऊन काय झाले ते बघ असे श्री. परूळेकर यांना संदिप राणे यांनी सांगितले. त्याप्रमाणे श्री. परूळेकर यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरट्याने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. आतील कपाटाचे लॉक तोडून कपडे विस्कटून टाकले होते. याबाबत वसंत परूळेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जानवलीतील बंद घर फोडून अज्ञाताचा चोरीचा प्रयत्न
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










