रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या मार्फत रो. अभिजीत परब यांच्या सौजन्याने शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेस डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या मार्फत रो. अभिजीत परब यांच्या सौजन्याने वेताळ बाबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेस आज डिजिटल स्मार्ट बोर्ड (एक लाख तीस हजार रुपये किमतीचा) भेट देण्यात आला. सदर कार्यक्रमाला वेताळबांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आप्पासाहेब गावडे रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, या कार्यक्रमाचे दाते ज्यांनी डिजिटल बोर्ड आपल्या स्वखर्चाने दिला ते रो. अभिजीत परब, रो. प्रमोद भोगटे, रो. रवींद्र परब, संस्थेचे पदाधिकारी वळंजू सर, संस्थेचे सहसचिव माजी पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, इतर पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद कर्पे सर, पर्यवेक्षक इतर सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वेताळ बंबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली शिक्षण संस्था असून ही संस्था नेहमीच आपल्या शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबविणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आग्रही असते. संस्था, शाळा आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीने आज ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली संस्था आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे एखादी मदत कोणत्यातरी दात्याने केली तर त्या मदतीचा सदुपयोग कसा करावा हे या संस्थाचालकांना आणि शिक्षकांना योग्यरित्या समजते. त्यामुळे दिलेल्या मदत तिथून जास्तीत जास्त प्रभावी शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न नेहमी संस्था करत आलेली आहे. भविष्यातही रोटरी क्लबच्या माध्यमातून याप्रशालेसाठी विविध उपक्रम राबवले जातील. असे मत रोटरीचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!