सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिंगले, माजी तालुकाध्यक्ष मकरंद परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष हर्षद बेग, सुनील हरमलकर, व्हिक्टर फर्नांडिस, अरुण मालंडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!