एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही कार्यकर्त्यांची मागणी- संजय आग्रे

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते संजय आग्रे माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे की, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रगतीशील विचारसरणीच्या आधारे राज्यातील जनतेचे प्रश्न सुटतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल.

या संदर्भात शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सर्व शिवसैनिकांची भावना मांडली. एकनाथ शिंदे ही मागणी मान्य करून आपले नेतृत्व कायम ठेवावे, हीच महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे. असे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!