मुंबई : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील जिल्ह्यांतील असून स्थानिक तरुण रोजगारासाठी मुंबईत स्थलांतर करत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले. स्थानिकांना थेट नोकरीत प्राधान्य देण्याऐवजी ‘जिल्हा संवर्ग पद्धत राबवल्यास हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा कायदेशीर मार्गही त्यांनी सुचवला. या निर्णयामुळे गावातील शाळा खऱ्या अर्थाने भरभराटीला येतील आणि रोजगाराअभावी कोकणात बंद असलेली ८० टक्के घरे पुन्हा उघडतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक बदल करावा, अशी आग्रही भूमिका जठार यांनी मांडली.

शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार
1
/
101
नागरी संरक्षण दलाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न #sindhudurg
आ. निलेश राणेंच्या कुडाळ नगरसेवकांना मिश्किल कोपरखळ्या #kudal #nileshrane
अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार; पावशी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक #kudal #pawashi
वाढीव वीज बिल व स्मार्ट मीटरविरोधात किनळोसकरांचा एल्गार! #kudal #sindhudurg
नारायण राणे यांनी केला संदेश पारकर यांचा खासदार म्हणून उल्लेख #narayanrane #kankavli
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
1
/
101

Subscribe










