आ.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवा

देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या “त्या ” पत्राची चर्चा

तुळसुली गावातील भा.के वारंग यांनी लिहिले पत्र

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत एक तर्फी विजय मिळविलेले आ.नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवा अशा आशयाचे एक पत्र सद्ध्या तुफान व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणुकी नंतर आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते नव्या मंत्री मंडळाचे त्यातच राज्यात नवा मुख्यमंत्री कोण याबाबत अजून शिक्कामोर्तब झाले नसताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळसुली गावातील एका आजोबांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र चांगलच चर्चेत आहे. तुळसुली गावातील भा.के.वारंग यांनी लिहिलेले हे पत्र आहे.

ते या पत्रात म्हणाले,मी सिंधुदुर्ग जिल्हयातील एक वयोवृध्द (आजचे माझे वय ८० वर्षे) असून मी शेतकरी आहे. अनेक वर्षे सहकार क्षेत्रामध्ये काम करीत आहे. गेल्या ३० वर्षापासून मी तुळसुली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी कार्यरत आहे.देशाचे माजी पंतप्रधान श्री. कै. जवाहरलाल नेहरू साहेब यांच्या मंत्रीमंडळामध्ये कोकणचे सुपुत्र कै. एस. के. पाटील हे रेल्वे मंत्री होते, त्यावेळेपासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. तळकोकणात प्रथमच ४० वर्षानंतर लोकसभेचे विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या रूपाने तळकोकणात कमळ फुलले. (म्हणजेच भा.ज.प. ची सत्ता आली.) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कणकवली मतदार संघातून आमदार नितेशजी राणे साहेब हे तीन वेळा भरघोस मतानी निवडून आले. आमदार नितेश राणे हे हिंदूत्ववाची नेहमी प्रखरतेने बाजू मांडीत असतात. त्यामुळे नितेशजी राणे यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लावावी अशी जिल्हयातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व तळागाळातील कार्यकर्त्यांची, तरूणांची मागणी आहे.तरी या मागणीचा विचारपूर्वक विचार व्हावा. तरी या वयोवृध्द सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्याचा आदर ठेवून आपण नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीमंडळात घ्यावे ही विनंती.

Oplus_131072
error: Content is protected !!