आकर्षक बक्षिसे तसेच प्रवेशिकंचा गौरव
कुडाळ प्रतिनिधी: पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड शिवाजी वाचन मंदिर मालवण शारदा ग्रंथालय कसाल व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी निर्माण करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी हो स्पर्धा मुक्त/खुली राहील.स्पर्धा एकूण मुख्य तीन प्रकारात होईल.
स्पर्धेचे विषय विभाग खालील प्रमाणे आहेत-
1. डिस्पोजेबल घटकांपासून शाश्वतपणे बनवलेल्या पिशव्या (कचऱ्यापासून सर्वोत्तम)
२. बहुउपयोगी पिशवी (multipurpose bag attractive bag)
आकर्षक पिशवी (attractive bag)स्पर्धेचे नियम आणि अटी व मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहेत-
१. सदरची स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरती मर्यादित असून या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी किंवा वास्तव्य असणारा कोणताही नागरिक स्त्री / पुरुष/अन्य सहभागी होऊ शकतील.
2. ही स्पर्धा मुक्त / खुली असल्याने कोणत्याही वयोगटातील स्त्री/ पुरुष / अन्य नागरिक सहभागी होऊशकतील.
3. स्पर्धक एक पेक्षा जास्त गटात स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. किंवा कोणत्याही गटात एक पेक्षा जास्त प्रवेशिका दाखल करू शकेल.
4. कोणत्याही स्पर्धा प्रकारातील पिशवी तयार करताना पर्यावरणास हानी पोहोचणार नाही किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा घटकांचा समावेश करण्यात यावा.
५. स्पर्धकांनी आयोजकाकडून पाठविण्यात आलेल्या लिक मध्ये आपली माहिती भरावी.
६. सदरची पिशवी/प्रवेशिका एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह एकत्रित प्रयत्न करून निर्माण करूनस्पर्धेत सहभागी होऊ शकेल.
७. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार यथोचित गौरव करण्यात येईल.
८. स्पर्धकांच्या प्रत्येक गटात विजेता, उपविजेता, सह विजेता अशा तीन क्रमांकांचा गौरव करण्यातयेईल. त्याशिवाय दर्जेदार निर्मिती असलेल्या गुणवत्तापूर्ण प्रवेशिकांचाही गौरव करण्यात येईल.
९. पारितोषिक / पुरस्कार यांचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.विजेता गौरव चिन्ह व रोख रक्कमउपविजेता गौरव चिन्हव रोख रक्कमसह विजेता गौरव चिन्ह व रोख रक्कमउत्तेजनार्थ रोख रक्कम व गौरव चिन्हगुणवत्ता पूर्ण व प्रभावी असलेल्या सर्व प्रवेशिकांना उत्तेजनार्थ पारितोषकांनी सन्मानित करण्यात येईल.
आपली प्रवेशिका या माहितीपत्रकात नमूद केलेल्या कोणत्याही आयोजक कार्यकर्त्याकडे पाठवू शकता किंवा खालील नमूद केलेल्या पत्त्यावर श्री अभिनव गुरव, पणदूर, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना पाठवू शकता.आपली प्रवेशिका सादर करताना प्रवेशिकेसोबत आपले पूर्ण नाव किंवा समूहाचे नाव समूहातील सदस्यांची पूर्ण नावे सर्वांचे संपर्क क्रमांक संपर्काचा पूर्ण पत्ता पिन कोड सह लिहून ही माहिती असलेला कागद त्या पिशवी सोबत किंवा त्या प्रत्येक पिशव्यांमध्ये घालूनच प्रवेशिका सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेबर, २०२४ आहे आपली प्रवेशिका किंवा आपल्या प्रवेशिका एका लखोट्यात किंवा पिशवीत घालू पिशवी बंद करून त्या पिशवीवरआयोजक, प्रयत्न २०२४, कापडी पिशवी स्पर्धा, अभिनव गुरव मु.पो. पणदूर, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग असे लिहून पूर्ण पत्त्यासहित सदरची पिशवी आयोजक यांचेकडे सुपूर्द करावी. आपण प्रवेशिका सुपूर्द केल्यानंतर आपली प्रवेशिका प्राप्त झाली याबाबत कळविण्यात येईल.आपली प्रवेशिका आपण या ठिकाणी जमा करू शकता.(आपण आपली प्रवेशिका किंवा आपल्या प्रवेशिका जमा केल्यानंतर ९०११६२५२८७ या क्रमांकावर आपले नाव, गाव, सादर केलेल्या प्रवेशोकांची संख्या व कुठे जमा केल्या याबाबत संदेश/मेसेज पाठवा SMS BAG to ९०११६२५२८७ असा sms करा.

















