कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम.
संतोष हिवाळेकर पोईप
    मालवण तालुक्यातील  माळगाव येथील ऍडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव या प्रशालेमध्ये 25 विद्यार्थ्यांना कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड श्री दीपेश गोसावी , गोवा ब्रांच मॅनेजर श्री सुरेश साळगावकर आणि श्री संकेत प्रभुदेसाई आणि शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले खजिनदार महादेव सुर्वे , संचालक हेमंत हडकर मुख्याध्यापक श्री. उदय जोशी, माजी विद्यार्थी पत्रकार अमोल गोसावी हे उपस्थित होते. 
      यावेळी कंपनीचे आयटी हेड श्री. दीपेश गोसावी यांनी मार्गदर्शन  करतांना सांगितले की, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड हा पोस्ट आणि बँकेप्रमाणेच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही केलेली छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात फार मोठा परतावा देऊ शकते.  एसआयपी या पर्यायातून तुम्ही छोट्या रकमेतून गुतवणूक कॅमेरा रोबेको मध्ये गुंतवणूक करू शकता . लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून गेली दोन वर्षे सिंधुदुर्गातील शाळांमधील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम कंपनी राबवत आहे. सायकलमुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे आरोग्य ही सुदृढ राहावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती साध्य करावी. 
यावेळी शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले यांनी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडअसेट मॅनेजमेंट कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलच्या स्वरूपात दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. माळगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी पत्रकार अमोल गोसावी यांच्या विशेष प्रयत्नातून  प्रशालेच्या २५ विदयार्थ्यांना सायकल उपलब्ध झाल्या त्याबद्दल त्यांचेही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. 
फोटो माहिती :- 
    कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून माळगाव हायस्कूल च्या २५ विद्यार्थ्याना मोफत सायकल वाटप करण्यात आले. त्यावळी कंपनीचे आयटी हेड दिपेश गोसावी , गोवा ब्रांचं मनेजर सूरज साळगावकर, संकेत प्रभुदेसाई, संस्था पदाधिकारी अरुण भोगले, महादेव सुर्वे , हेमंत हडकर, मुख्याध्यापक उदय जोशी आदी उपस्थित होते.1
 / 
67


आणि राजन तेली खळखळून हसले...  #sindhudurg #rajanteli #nileshrane

उद्या वैभव नाईक जरी पक्षात येत असतील तरी त्यांचे स्वागत करा #nileshrane #vaibhavnaik #rajanteli

बीजेपीमध्ये जे आहेत ते सगळे माझेच सहकारी आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #deepakkesarkar

निलेश राणे उभे आहेत ना १०० % मी निवडून येणार Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik #sindhudurg

कापा म्हणजे ? मर्डर करा ? एवढं सोपं आहे का ? निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #sindhudurg #kudal

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी  ACB कटिबद्ध #sindhudurg #acb

तुझ्या औकातीत रहा संजू परब यांचा विशाल परबांना थेट इशारा #sawantawadi #vishalparab #sanjuparab

खोटया गुन्हयात अडकवले वकीलांचा पोलिसांवर आरोप #sindhudurg #kudal #breakingnews

रणझुंजार मित्रमंडळ नेरूर व रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल #sindhudurg #kudal

तेर्से बांबर्डे मळावाडी येथील ब्रिजचे काम शंभर टक्के पूर्ण करणार- निलेश राणे Nilesh Rane #nileshrane

कोणी कोणाला काढलं तेच समजत नाही ! #rajthackeray
1
 / 
67

 
	

 Subscribe
Subscribe









