वाढदिवसानिमित्त बोर्डवे व करंजे येथील आश्रमशाळेतील मुलांना केले खाऊ वाटप
कणकवली – युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रतीक रासम व मित्रमंडळाने राजश्री छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालय-करंजे व प्राथमिक आश्रमशाळा-बोर्डवे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. प्रतीक रासम मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याचे भान ठेऊन आपण दरवर्षी वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करतो असे यावेळी रासम यांनी सांगितले. यावेळी आश्रम शाळेतील विदयार्थ्यांनी प्रतीक रासम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक वर्गाने देखील शुभेच्छा देत आभार व्यक्त केले. यावेळी राज विचारे, स्वरुप राणे, चेतन गुरव, कमलेश नारकर, समीर उबाळे, हर्षद डिचोलकर, अंकुर जाधव, राहुल राठोड, राज चव्हाण, पार्थ मयेकर, देवेंद्र पुजारे. आदी प्रतिक रासम मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.