सिंधुदुर्गात घुमतोय एकच नारा

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचं वादळ उद्या घोंघावणार

सोबत असणार पालकमंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे

मोठ्या संख्येने राणे समर्थक राहणार उपस्थित

सिंधुदुर्ग : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर सिंधुदुर्गाच्या राजकारणात उद्या रविवारी सकाळी प्रचंड राजकीय वादळ घोंघावणार आहे. माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रथमच होणाऱ्या जिल्हा आगमनाने केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“एल्गार रॅली” या नावाखाली बांदा ते कणकवली दरम्यान निघणार महाशक्ती रॅली. ही रॅली म्हणजे थोडक्यात राणे ब्रॅण्डचा सडेतोड एल्गारच ठरणार आहे. या रॅलीत पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची उपस्थिती असणार असल्याने कार्यक्रमाचं राजकीय वजन अधिकच वाढलं आहे.

उद्या सकाळी बांदा येथे नारायण राणेंचं जंगी, अभूतपूर्व स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि राणेप्रेमी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार आहेत. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, आक्रमक घोषणा आणि उसळणारा जनसागर संपूर्ण सिंधुदुर्गात “राणे ब्रॅण्ड” पुन्हा एकदा दणक्यात दिसून येणार आहे.

या रॅलीतून राणे समर्थकांना संपवण्याचा कथित कट रचणाऱ्या अदृश्य शक्तींना आणि विरोधकांना थेट, स्पष्ट आणि ठाम संदेश दिला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे “एकच वाघ… राणे ब्रॅण्ड!”

आज जिल्हाभर “राणे येतायत” हीच चर्चा रंगलेली असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता आणि धाक स्पष्टपणे जाणवत आहे. उद्याचा दिवस केवळ स्वागताचा नसून, तो आगामी राजकारणाची ठोस नांदी ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

या भव्य शक्तिप्रदर्शनातून नारायण राणे अजूनही सिंधुदुर्गातील सर्वात मोठी, निर्णायक आणि प्रभावी राजकीय शक्ती आहेत, हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होणार आहे. उद्याची एल्गार रॅली म्हणजे सिंधुदुर्गाच्या राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात ठरणार, यात शंका नाही.

error: Content is protected !!