सुदैवाने वाचले प्राण
बांदा : येथील उड्डाणपूल आशापुरी सिरॅमिक शॉपच्या समोर डिव्हायडर मधील आठ फूट खोल खड्ड्यात आज गुरुवारी सायंकाळी बांदा येथील बँक ऑफ इंडिया या बँकची कर्मचारी मनीषा मीना वय 28 वर्ष हि पडली. सायंकाळी सात वाजता एका हॉटेल मधून जेवून ती रुमवर जाण्यासाठी रस्ता क्रॉस करताना ही घटना घडली. खड्ड्यात पडल्यावर मला वाचवा, मला वाचवा असा आरडाओरडा ती करत होती. परंतु तिचा आवाज कोणा पर्यंत हि पोहोचत नव्हता. जखमी अवस्थेत तिने पर्स मधून मोबाईल काढून आपल्या बँक स्टाफच्या एका कर्मचाऱ्याला फोन केला. कर्मचारी तेथे लगेच आला. परंतु घटनास्थळी त्या कर्मचाऱ्याला ती युती कुठे दिसत नव्हती. तो दहा मिनिटे तेथे शोधत होता. अखेर त्याने सहज म्हणून त्या खड्ड्यामध्ये टॉर्च मारुन पाहिलं तेव्हा ती खड्ड्यामध्ये पडलेली दिसली. तेथील नागरिकांनी तिला लगेच बाहेर काढले. तिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत असल्यामुळे बांदा आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी तिला अमोल सावंत यांच्या खाजगी रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रुपा मुद्राळे व रवी जाधव यांनी तीला उपचारासाठी सहकार्य केले. रस्त्यामध्ये असे खड्डे मारुन ठेवल्यावर रात्रीच्या वेळी त्या खड्ड्यात पडून कोणाचातरी जीव जाऊ शकतो याचं हे जीवंत उदाहरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन असे जीवघेणे खड्डे त्वरित भरावे अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे. याप्रसंगी रुपा मुद्राळे, स्टाफ मेंबर अमोल त्रिवेदी, मंगेश राठोड व राजेश कुमार जेना हे तिच्यासोबत उपचारांती रात्री तिला रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आले.


Subscribe








