अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकजण ताब्यात

सावंतवाडी तालुक्यातील घटना

सावंतवाडी : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. या घटनेची माहिती मुलीने आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय .38 रा. सावंतवाडी याच्या विरोधात विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रात्रौ त्याला पोलिसांनी अटक केली.अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून दुकानात जात असताना संशयित सनी पाटील याने तिचा पाठलाग करून छेड काढली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आपल्या घरातील नातेवाईकांना दिली. तत्काळ नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिता विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित सुनील उर्फ सनी बाळू पाटील यांच्या विरोधात विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्काळ पोलिसांनी संशयीताचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो घरातून पळून गेल्याने पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. मात्र पोलीसानी शहरात विविध ठिकाणी शोध घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!