शिवसेना महिला आघाडीचे श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे
कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, तालुकाप्रमुख रचना नेरूरकर, संगीता खांडेकर उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, वैष्णवी शिंदे, विभाग प्रमुख परिनिता शिगले, पिंगुळी विभागप्रमुख शमिका कुडाळकर, शाखाप्रमुख ऋतुजा कदम, ममता झोरे, कीर्ती चव्हाण, मधुरा बखले, कीर्ती चव्हाण, नंदा कदम, दीपिका तुळसकर, स्नेहा पावसकर, मेघा शिरसाट, ज्ञानेश्वरी सडवेलकर, जागृती तोरसकर, प्रीती नेमळेकर आदी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबविल्या असून महिला सक्षमीकरणासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यासाठी कुडाळच्या ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे घालून प्रार्थना केली.