भरणी कदमवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मान. सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते संपन्न…

कुडाळ : मौजे भरणी येथील बहुचर्चित आणि गेली अनेक वर्षे प्रलंबित भरणी कदमवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आज शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मान. सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला.

सदरील काम आमदार मान.श्री. निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर झाला आहे. या रस्त्यामुळे भरणी कदमवाडी येथील नागरिकांची गेले अनेक वर्षांची मोठी गैरसोय दूर झाल्याने सर्व ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. सचिन तेली, माजी पंचायत समिती सदस्य श्री. बाळू मडव, महिला तालुका सचिव सौ.रेवती राणे, कुडाळ महिला शहर प्रमुख सौ.श्रुती वर्दम, विभाग सचिव श्री. राजेंद्र परब, श्री. चेतन ढवळ, भरणी सरपंच सौ अश्विनी मेस्त्री, उपसरपंच श्री.दिलीप कदम, ग्रा. प सदस्य श्री.विशाल मेस्त्री, सौ. सारिका परब, पोलीस पाटील सौ. सरोज काजरेकर, शिवसेना शाखा प्रमुख श्री नंदकिशोर सरंगले, सुशील परब, प्रणेश सावंत तसेच शिवसैनिक आणि भरणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामी सन्माननीय बाळा राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप कदम व राजू परब यांनी सन्माननीय आमदार मान.श्री.निलेश राणे साहेब, जिल्हाप्रमुख मान.श्री.दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख मान.सौ. दिपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव मान. श्री.दादा साईल, तालुका प्रमुख मान.श्री.विनायक राणे, विभागप्रमुख श्री.विठ्ठल तेली यांनी भरणी गावातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले…

error: Content is protected !!