कुडाळ महसूल पथकाची कारवाई
कुडाळ : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुडाळ महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून, मा. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ महसूल पथकाने नाबरवाडी येथे दोन अवैध वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहेत. ही कारवाई दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.३० च्या दरम्यान करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तहसिलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने नाबरवाडी परिसरात अचानक गस्त घालत असताना, अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन डंपर आढळून आले.
या पथकामध्ये खालील मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सगरे, शिवदास राठोड यांचा समावेश होता. पथकाने पकडलेल्या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रत्येकी दोन ब्रास याप्रमाणे एकूण चार ब्रास वाळूचा अवैध साठा आढळून आला.
जप्त केलेल्या वाहन क्रमांक MH 07 AH 1865 संजय शिंदे, बांदा, MH 14 HG 7516 दयानंद अनावकर, पणदूर महसूल विभागाच्या नियमानुसार, दोन्ही वाहनांवर व त्यांच्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.



Subscribe






