कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भाकरी आणि फूल कवी संमेलनच्या निमित्ताने आयोजीत सत्काराला सन्मानपूर्वक निमंत्रण.
कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा, अनंत काणेकर स्मृती पुरस्कार ‘मंत्रभूल’ साहित्यकृतीस झाला आहे प्राप्त..!
मालवण : कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेच्या वतीने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी को. म. सा. प. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भाकरी आणि फूल कवी संमेलन सकाळी १०:१५ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा, अनंत काणेकर स्मृती पुरस्कार आपल्या ‘मंत्रभूल’ साहित्यकृतीस प्राप्त झाला आहे. यानिमित्त या मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते मालवणच्या लेखिका वैशाली पंडित यथोचित सत्कार केला जात असून, या सत्काराला उपस्थितीचे सन्मानपूर्वक निमंत्रण कोमसाप शाखा कुडाळच्या वतीने देण्यात आले आहे.