सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांचा कोल्हापूर येथे सन्मान

कोल्हापूर : सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ही भारतीय महिला मंच आयोजित, महिलांनी महिलांसाठी पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या त्या सिंधुदुर्गातील एकमेव महिला होत्या. सीताराम संजीवनी आश्रमाच्या त्या मुख्य परिचारिका असून त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आहे. अनाथांची नाथ व निराधारांचा आधार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सिंधुदर्पण न्युज चॅनेलकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

error: Content is protected !!