कणकवली तालुक्यातील घटना
रस्ता ओलांडताना घडला अपघात
कणकवली : आचरा मार्गावरील कलमठ सुतारवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला दुचाकीची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (ता. १३) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. जुमाबी हसन शिरगावकर (वय ६५, रा.मणचे, मुस्लीमवाडी) असे मयत झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
कलमठ सुतारवाडी येथील सरफराज साखरकर याचा अपघात झाला होता. त्याला पाहण्यासाठी मणचे मुस्लीमवाडी येथून जुमाबी शिरगावकर, हुसेन साखरकर आणि आणखी काही नातेवाईक काल (ता. १३) कलमठ सुतारवाडी येथे आले होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास यातील जुमाबी शिरगावकर ही रस्ता ओलांडत होती. त्यावेळी आचरा मार्गावरून निरोम ते कणकवली असा प्रवास करणारा दुचाकीस्वार साहील अरूण नार्वेकर (वय २५, रा. निरोम, ता. मालवण) याच्या ताब्यातील दुचाकीची (एमएच ०७ ओआर ८८३४) ची धडक जुमाबी यांना बसली. यात जुमाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुसेन साखरकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार दुचाकीस्वार साहील नार्वेकर याच्यावर कणकवली पोलिसांनी अविचाराने आणि भरधाव वेगाने वाहन चालवणे, पादचाऱ्याल धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे करत आहेत.














 
	

 Subscribe
Subscribe









